Palghar Lynching Case Hearing in Supreme Court: पालघर  हत्याकांड प्रकारणी जनहित याचिकांवर महाराष्ट्र सरकार आणि अन्य यंत्रणांना उत्तर देण्याचे सर्वोच्च सरकारचे आदेश
Supreme Court | (Photo Credit: ANI)

काही महिन्यांपूर्वी पालघर जिल्ह्यानजिक झालेल्या तिहेरी हत्याकांडामुळे महाराष्ट्रासह सारादेश हादरला होता. दरम्यान आता या पालघर हत्याकांडामध्ये तपासणी सुरू असून आज (11 जून) सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबतच्या याचिकेवर सुनावणी केली आहे. भारतातील न्यायव्यवस्थेतील अंतिम कोर्ट असणार्‍या सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र सराकार आणि अन्य यंत्रणांना जनहित याचिकांवर आपलं उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच योग्य एजंसीच्या माध्यामातून याप्रकरणामध्ये तपासाची पुढील दिशा ठरवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. आता पालघर हत्याकांडाच्या या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्यात दुसर्‍या आठवड्यात होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

ANI Tweet

पालघर येथील, गडचिंचले भागात काही दिवसांपूर्वी स्थनिकांनी चोर असल्याच्या संशयावरून, चालकासह तीन व्यक्तींना मारहाण केली होती. यामध्ये जूना अखाड्यातील दोन साधूंसह ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्यातील कायदा व सुवस्थेवर प्रश्न उभारण्यात आला होता. दरम्यान त्यानंतर 115 जणांपेक्षा अधिकांना अटक करण्यात आली आहे. पालघर पोलिस अधिकार्‍यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. आरोपींचा सीआयडीकडे असून याप्रकरणी कसून तपास सुरू आहे. पालघर जिल्ह्यासाठी दत्तात्रय शिंदे यांची नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती

पालघर मॉब लिंचिंग प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न करण्यात आला मात्र मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा प्रकार अफवेमधून झालेल्या गैरसमजुतीने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.