Maharashtra Coronavirus: महाराष्ट्रामधील कोरोना विषाणू लढाईमध्ये राज्यात Dhule जिल्ह्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्क्यांवर
Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) काल 14,976 कोरोना विषाणू (Coronavirus) बाधीत रुग्णांची वाढ झाली असून, सध्या 2,60,363 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशात राज्यातील प्रत्येक जिल्हा या कोरोना विषाणू लढाईमध्ये विविध उपाययोजना राबवून फार मोठे योगदान देत आहे. मात्र आरोग्य विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील कोविड-19 युद्धात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा म्हणून धुळे (Dhule) पहिल्या स्थानी आहे. धुळे जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)  जवळपास 85 टक्क्यांवर, तर कोविड डब्लिंग रेटमध्ये सुद्धा धुळे जिल्हा अग्रस्थानी आहे.

धुळे जिल्ह्याच्या कामगिरीमुले वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सर्व संबंधित यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. आरोग्य विभागाच्या एकत्रित संकलित अहवालानसुार, धुळे येथील कोविडमुक्तांचे प्रमाण 84.22 टक्के इतके असून ते महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रमाण आहे. याशिवाय कोविड डब्लिंग रेटमध्ये सुद्धा धुळे जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आहे. धुळे जिल्ह्यात कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सुरुवातीला 100 टक्के होते, मात्र आता यात सुधारणा होऊन हा मृत्यू दर 2.66% इतका खाली आला आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे अभिनंदन आणि आभार मानले आहेत.

कोविड-19 परिस्थिती पाहता, पालकमंत्री श्री.सत्तार यांनी धुळे जिल्ह्यासाठी लिक्विड ऑक्सिजन युनिटला मान्यता दिली. तर धुळ्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय यादव यांच्या नेतृत्चाखाली सर्व टीम काम करीत आहे. 23 सप्टेंबर 2020 च्या आरोग्य विभागाच्या अहवालानसुार धुळे येथील श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे प्रामुख्याने येथील आदिवासी, दुर्बल आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील नागरिक येत असतात. याच रुग्णालयात कोविड-19च्या रुग्णांवरही उपचार करण्यात येत आहेत. (हेही वाचा:  महाविकासआघाडी सरकारचा केंद्रला धक्का, कृषी कायदा अंमलबजावणीबाबतचा अध्यादेश स्थगित)

दरम्यान नवरात्रीमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रीमध्ये घरात तसेच मंडपात देवीची मूर्ती बसवली जाते. त्याबाबत आता घरात असलेल्या मूर्ती 2 फूटांपेक्षा जास्त उंच असू शकत नाहीत आणि मंडपांमधील मूर्त्या 4 फूटांपेक्षा कमी असाव्यात, असे सरकारने सांगितले आहे.