'आम्ही आताच शपथ घेतलीय, अजून खिसे भरणे बाकी आहेत' काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचे वादग्रस्त विधान
काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची कमान उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानंतर आता नुकताच मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने त्याबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. एका सभेला संबोधित करताना यशोमती ठाकूर यांनी असे म्हटले आहे की, आमचे सरकार नव्हते. आम्ही शपथ घेतली आहे की आम्हाला खिसे भरायचे आहेत. यशोमती ठाकूर यांचे हे विधानावर संताप व्यक्त केला जात आहे.

यशोमती ठाकूर यांनी पुढे असे ही म्हटले की, जे विरोधात आहेत त्यांचे खिसे भरलेले आहेत. त्यामुळे जर ते आपल्याकडे येऊन त्यांच्यामधील हिस्सा देत असल्यास नको असे म्हणू नका. कारण घरात आलेल्या लक्ष्मीला कोण नाही म्हणार नाही. मात्र त्यांनी मत काँग्रेसला द्यायला हवे. खरंतर एका स्थानिक निवडणूकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. यशोमती ठाकूर यांच्या या वादग्रस्त विधानावर अद्याप काँग्रेसकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्याचसोबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने सुद्धा यावर बोलणे टाळले आहे.(मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्र पर्यटन मजबूत करून अर्थव्यवस्था सुधारवण्याचा निर्धार)

ANI Tweet:

दरम्यान महाराष्ट्रात रविवारी खातेवाटप करण्यात आले. त्यानुसार खातेवाटपात अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे गृह, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, आणि आदित्य ठाकरेयांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, शनिवारी राजीनामा नाट्यामुळे चर्चच्या आलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य खाते सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, खाती घेतली आहेत.