मंत्रिमंडळ खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्र पर्यटन मजबूत करून अर्थव्यवस्था सुधारवण्याचा निर्धार
Aaditya Thackeray | Photo Credits: Facebook

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे खातेवाटप आज, 5 जानेवारी रोजी अधिकृत रित्या जाहीर करण्यात आले आहे. शिवसेना (Shivsena) , काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या नेत्यांनी बैठक घेऊन तयार केलेल्या प्रस्तावित खातेवाटपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatisingh Koshyari) यांची स्वाक्षरी मिळाल्यावर याबाबत राजभवनातुन अधिकृत घोषणा करण्यात आली. खातेवाटपात ठाकरे कुटुंबाचे पहिले वाहिले आमदार आणि नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना पर्यटन व पर्यावरण, राजशिष्टाचार खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खातेवाटपानंतर आदित्य यांनी माध्यमांशी संवाद साधताना आंनद व्यक्त करून आपण महाराष्ट्राचे पर्यटन (Maharashtra Tourism) सुधारून अर्थव्यवस्थेला भर पाडण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे. उद्यापासून आदित्य आपल्या मंत्रालयाची जबादारी स्वीकारणार असून कामाचा श्रीगणेशा करणार आहे.

आजच्या खातेवाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व अधिक दिसून येत आहे. वित्त, जलसंपदा, गृहनिर्माण सहित अनेक खात्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांना संधी मिळाली आहे. इथे पहा खातेवाटपाची मंत्रीनिहाय संपूर्ण यादी.

ANI ट्विट

दरम्यान, आदित्य ठाकरे यांना शिवसेनेच्या तिकिटावर वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली होती. आदित्य यांचा वरळी मधील विजय म्हणजे ठाकरे कुटुंबाचे सक्रिय राजकारणातले पहिले पाऊल होते. उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यावर सुरुवातीला एकाच कुटुंबातील दोन जण सरकारमध्ये नको असे म्हणत आदित्यला मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. याऐवजी आदित्यला शिवसेना पक्षाची एखादी मुख्य भूमिका दिली जाणारअसेही म्हंटले जात होते मात्र 30 डिसेंबर म्हणजेच मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या दिनीच आदित्यला देखील कॅबिनेट मंत्री म्हणून नेमण्यात येण्याची घोषणा करण्यात आली होती.