Eknath Shinde Visit Pimpri Chinchwad: पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad)गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच आहे. त्यामुळे पुण्यातील धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी पावसाच्या दिवसातच खबरदारी म्हणून धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले आहे. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या भागात पूर्वपरिस्थिती निर्माण झाली. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली गेली. तरी पुरामुळे नागरिकांचे प्रचंड (Flood in Pune)नुकसान झाले. परिणामी नागरिकांच्या सेवेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) हे पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले. त्यांनी पुण्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी दौरा नियोजीत केला.(Pune Rain News: पुणे - पिंपरीत पाणीच पाणी, अनेक भागातील वीजपुरवठा बंद)
पिंपरी चिंचवड मधील भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळेत पुरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडल्या आहे. त्यावेळी शिंदे यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तू दिल्या. पिंपरीत अतिवृष्टीमुळे पवना धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीवरील घरांमध्ये तसेच सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. (Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी)
पोस्ट पहा
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde meets and distributes relief material to the people in flood-affected areas of Pimpri Chinchwad. pic.twitter.com/bNw9fHMRmI
— ANI (@ANI) August 5, 2024
या स्थळांची पाहणी करून धोकादायक ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या सुमारे १ हजार नागरिकांना रविवारी महापालिकेच्या वतीने निवारा केंद्रांमध्ये तसेच नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित केले आहे. आज दुपारी १२.३० च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे पुणे विमानतळ येथे आगमन झाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मनपा शाळा जुनी सांगवी येथे पुरग्रस्त भागाची पाहणी केली आणि पुरग्रस्तांशी चर्चा केली. त्यानंतर शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, पीएमसी कॉलनी वाकडेवाडी या भागात भेट देणार आहेत.
सिंहगड रोड भागात मागील आठवड्यात पाणी सोडल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे नुकसान झाले होते. त्या भागातील एकता नगरी येथे नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुणे विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.