Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सोमवारी 5 ऑगस्ट रोजी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान खात्याच्या (IMD)अंदाजानुसार आज सोमवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी(Yellow Alert in Mumbai) करण्यात आला आहे. मुंबईत वेगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. अपेक्षित परिस्थितीनुसार, मुंबईत कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मुंबईतील रहिवाशांना हवामान अहवालांवर अपडेट राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. (हेही वाचा:Ujani Dam Overflow: सोलापूरचे उजनी धरण भरले, 40 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग; पंढरपूरसह काही गावांना पुराचा धोका)
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई, कोकणासह पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा तसेच विदर्भातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (हेही वाचा: Pune Rain News: पुणे - पिंपरीत पाणीच पाणी, अनेक भागातील वीजपुरवठा बंद)
उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह तुफान पावसाचा इशारा देण्यात आलाय. नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे आज सोमवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पोस्ट पहा
🗓️ ५ ऑगस्ट २०२४
⛈️☔मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक स्वरूपाचा पाऊस तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
🌊भरती:
🌝 दुपारी १२:५६ वाजता - ४.३७ मीटर
🌝 रात्री ०६.०८.२०२४ रोजी - ००:४९ वाजता - ३.८६ मीटर
ओहोटी:
🌚सायंकाळी ०६:५९ वाजता - १.४६ मीटर
🌚उद्या ०६.०८.२०२४…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2024 08:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

