सोलापूरच्या उजनी धरण (Ujani dam) तुडुंब भरू लागले असून येणाऱ्या पाण्याची अवाक 1 लाख क्युसेक पर्यंत जाऊ लागल्याने आज सायंकाळी धरणातून तब्बल 20 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. भीमा नदीत (Bhima River) हा विसर्ग सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून व्यास नारायण वसाहतीमधील 500 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. आज सकाळी उजनी धरणाने 90 टक्क्यांची पातळी गाठली असताना वरुन धरणाकडे येणाऱ्या पाण्याची (Water) अवाक 1 लाख क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग हा करण्यात आला आहे. (हेही वाचा - Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाच तलाव भरले, सर्व धरणांमध्ये एकूण 89 टक्के जलसाठा)
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण 100 टक्के भरल्याने आता सोलापूर जिल्ह्यासह , नगर , उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागाचा पिण्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे .
पाहा व्हिडिओ -
उजनी धरण जलाशय आज सकाळी १० वाजता ८६ % टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये आज संध्याकाळी ५ वाजता २०००० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. pic.twitter.com/ZqGMGdyBmy
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 4, 2024
उजनी धरणाची एकूण क्षमता 117.23 TMC असून यात जिवंत साठ्यात 53.57 TMC तर मृत साठ्यात 63.66 TMC पाणी साठवता येते. यावर्षी धरणाने नीचांकी पातळी गटात वजा 60 टक्के एवढी पातळी गाठली होती. मात्र, जून महिन्यापासूनच पुणे जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसाने आज 4 ऑगस्ट रोजी धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली आहे.
वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने पंढरपूर शहरातील व्यास नारायण वसाहतीतील 500 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यास प्रशासनाने केली सुरुवात आहे. आज रात्रीपासून पुन्हा चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. उजनी धरणाचे 16 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले असून उजनी धरणातून भीमा पात्रात 21 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला.