नागपूर: पबजी गेममध्ये हरला म्हणून इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या
Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पबजी गेममध्ये (PUBG Game) हरला म्हणूनआत्महत्या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) येथील नर्मदा कॉलीनीत सोमवारी घडली आहे. याप्रकरणी पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत, मुंबई मिरोरने याबाबत वृत दिले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. पबजीमुळे आत्महत्या केल्याची ही पहिली घटना नसून याआधीही अनेकांनी आपला जीव गमवला आहे. तसेच ज्या मुलांना पबजी गेम खेळण्याचे वेड आहे, अशा मुलांच्या पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला मुलगा दिवसभर मोबाईल मध्ये पबजी गेम खेळत असे. मात्र, पबजी गेममध्ये हारल्यानंतर तो तणावात गेला होता. यातूनच सोमवारी त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे वडील नागपूर जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवल्यामुळे लहान मुले घराच वेळ घालवत आहेत. दरम्यान, अनेकांना पबजी खेळण्याचे वेड लागले आहे. मात्र, पबजी खेळताना लहान मुले तणावात जाऊन आत्महत्यासारखे टोकाचे पाऊन उचलत आहेत. हे देखील वाचा-धक्कादायक! मोठ्या भावाने हातातील समोसा हिसकावून घेतला म्हणून 11 वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या; नागपूर येथील घटना

याआधी नागपूर येथील कोटल रोडवरील गंगानगर येथे मोठ्या भावाने हातातील समोसा हिसकावून घेतल्याने 11 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. ही घटना रविवारी घडली होती. मृत्यू पावलेल्या मुलाने घरातून 10 रुपये नेऊन समोसा आणला होता. परंतु, त्याने आणलेला समोसा त्याच्या मोठ्या भावाने खाऊन घेतला. त्यामुळे त्याने दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.