धक्कादायक! मोठ्या भावाने हातातील समोसा हिसकावून घेतला म्हणून 11 वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या; नागपूर येथील घटना
Representational Image (Photo Credits: File Image)

मोठ्या भावाने हातातील समोर हिसकावून घेतला म्हणून 11 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना नागपूर (Nagpur) येथील कोटल रोडवरील (Kotal Road) गंगानगरमध्ये (Ganganagar) रविवारी घडली आहे. ही घटना समजताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मृत्यू पावलेल्या मुलाने घरातून 10 रुपये नेऊन समोसा आणला होता. परंतु, त्याने आणलेला समोसा त्याच्या मोठ्या भावाने खाऊन घेतला. त्यामुळे त्याने दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू पावलेल्या मुलाने कुटुंबाला न सांगता घरातून दहा रुपये घेतले अन् त्या पैशाचा समोसा खरेदीसाठी केला. मात्र, घरी आल्यानंतर त्याच्या 13 वर्षीय मोठ्या भावाने त्याच्या हातातून समोसा हिसकावून घेतल्याने तो जोरात ओरडू लागला. मोठ्या भावाने आपल्या हातातील समोसा खाल्ला, अशी तक्रार त्याने आपल्या आईकडे केली. त्यावेळी त्याच्या आईने त्याला आणखी एक समोसा घेऊन येण्यास पैसे दिले. खूप उशीर झाला तरी तो समोसा घेऊन घरी परतला नसल्याने आई त्याला पाहण्यासाठी बाहेर आली. परंतु, तो कुठेच दिसला नाही. त्यावेळी दुसऱ्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी दार तोडून पाहिले तर, 11 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले. हे देखील वाचा- Watch Video: कोरोनावर मात करुन आलेल्या मोठ्या बहिणीचे धाकटीकडून दणक्यात स्वागत; सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर कौतूकाचा वर्षाव

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात सर्वाधिक आत्महत्येची नोंद पुणे जिल्ह्यातून झाली आहे. यातच नागपूर येथे आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समजत आहे. या घटनेने संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.