महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे संकट आणखी गडद होताना दिसत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत. सध्या मुंबई शहराला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले आहे. मात्र, पुणे शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट होताना दिसत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण पुणे शहरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील स्वामी समर्थ नगर भागात राहणाऱ्या एका तरुणीने या खडतर काळात सकारात्मक कसे रहायचे? याचे एक उदाहरण घालून दिले आहे. कोरोनावर मात करुन आलेल्या मोठ्या बहिणीचे दणक्यात स्वागत करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर अनेकांकडून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

सलोनी सातपुते असे स्वागत करणाऱ्या तरूणीची नाव आहे. सलोनी ही पुण्यातील स्वामी समर्थ नगर भागातील रहवासी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सलोनीच्या घरातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, एकड्या सलोनीची अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, सलोनीची मोठी बहीण स्नेहल कोरोनावर मात करून घरी परतल्यानंतर तिने हटके अंदाजात तिचे स्वागत केले आहे. सलोनीने हट जा रे छोकरे…या हिंदी गाण्यावर डान्स करत आपल्या मोठ्या बहिणीचे दणक्यात स्वागत केले आहे. सलोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! 30 रुपयांची लाच दिली नाही म्हणून 6 वर्षांच्या निष्पाप मुलाला ओढायला लावला स्ट्रेचर; व्हिडिओ व्हायरल, डीएमनी दिले चौकशीचे आदेश (Watch Video)

ट्वीट-

काश्मीरचे पत्रकार अदित्य राज कौल यांनी देखील हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ मला आवडला आहे. कोरोनामुक्त झालेल्या मोठ्या बहिणीचे एक तरूणी स्वागत करत आहे. या व्हिडिओत आनंद, साधेपणा, कौटुंबिक मूल्ये, धैर्य आणि प्रेम अशा अनेक गोष्टी स्पष्ट दिसून येत आहेत. खरोखर हीच भारताची भावना आहे, अशा अशायाचे ट्विट त्यांनी केले आहे.