CM Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार ? काय जाहीर करणार? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन निर्बंध आणखी कडक करण्यात येणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र, 26/11 यांसह विविध मुद्यांवर चर्चा केली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. तसेच राज्यातील प्रत्येक नागरिकांना नियमितपणे तोंडावर मास्क घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगच्या नियमाचे पालन करा, अशीही विनंती त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्येत घट होत असताना राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेशी संवाद साधला आहे. हे देखील वाचा- नाशिक मध्ये पुन्हा संंचारबंदी? सोशल मीडीया मध्ये जुन्या बातम्यांचे स्क्रीन शॉर्ट शेअर करत अफवांंचे पेव

महत्वाचे मुद्दे- 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेने नेहमीच सहकार्य केले आहे.

-  महाराष्टात आतापर्यंत आपण जो लढा दिला आहे, त्यात यश मिळवले आहे, कोरोनावरही मिळवू.

- कार्तिकी यात्रेला गर्दी न करता वारी भक्ती भावाने करूया.

- महाराष्ट्राच्या आरोग्याचा नकाशा तयार करायचा आहे.

- डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील ताणतणाव वाढू नये याची नागरिकांनी दक्षता घ्यावी.

कोरोना गेलेला नाही, कृपया गर्दी करू नका. गर्दी झाली तर, कोरोना वाढणार.

-  कोरोनाची दुसरी लाट नव्हेतर त्सुनामी येईल, अशी भिती वाटत आहे.

 - कोरोनावरील लस अद्यापही आलेली नसून नागरिकांनी नियमितपणे मास्क घालावे, सामाजिक अंतर पालन करावे, तसेच सतत हात धुत राहवे, सध्या हेच तीन उपाय आहेत.

- कोरोनावरील लस येईल, तेव्हा येईल पण सध्या काळजी घ्यावी.

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा उघडणे अजूनही प्रश्नांकित आहे.

- रुग्णालय कमी पडली तर, कोणती वाचवू शकणार नाही.

- राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावायचा नसेल तर, नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राज्यात आज बऱ्याच दिवसांनी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 5 हजार 753 रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 60 रुग्णांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले. राज्याचा रिकव्हरी रेट 92.75 वर पोहचला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 51 हजार 64 एवढी झाली आहे. राज्यात मृत्यू दरात आज घट दिसून आली. गेल्या 24 तासांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 17 लाख 80 हजार 208 एवढी झाली आहे.