Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोरोना वायरसचे (Coronavirus) रूग्ण वाढत असल्याने आता आरोग्य यंत्रणा पुन्हा अति सज्जतेने कामाला लागली आहे. दरम्यान युरोपामध्ये वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने तशीच परिस्थिती भारतामध्ये होणार का? अशी चर्चा आहे. पण सरकारने अजूनही कोरोना वायरस लॉकडाऊन पुन्हा कडक केलेला नाही. परंतू समाजकंटकांनी या भीतीचा गैरफायदा घेत काही अफवा सोशल मीडियामध्ये पसरवण्यास सुरूवात केली आहे. ट्वीटरवर एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या जुन्या बातम्यांचे फोटो शेअर करून पुन्हा नाशिक (Nashik)  मध्ये कर्फ्यू (Curfew) लागणार, संध्याकाळी 7 नंतर बाहेर पडल्यास कारवाईच्या आदेशाचे फोटो शेअर केले जात आहेत. मात्र अधिकृत रित्या अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज आपत्कालीन यंत्रणेच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा केली आहे. मात्र त्यामध्ये केवळ शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय झालेला आहे. अजुनही नाशिकमध्ये कर्फ्युचे आदेश दिलेले नाहीत.

जुन्या बातम्यांचा अहवाल देत व्हायरल होणारे ट्वीट

अफवा असल्याचे ट्वीट

आज नाशिक जिल्ह्यामधील शाळा 4 जानेवारी 2021 पर्यंत सुरू करण्यात येणार नाही असा निर्णय आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. School Reopen in Pune and Pimpri-Chinchwad: कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील शाळा सुरु करण्याचे लांबणीवर.

महाराष्ट्रामध्ये काल आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 5760 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व 4088 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1647004 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 78273अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.82% झाले आहे.