Representatives Image

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ (MSBSHE Board) यंदा दहावी बारावीचे निकाल (HSC Result) 15 पूर्वी लावणार आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देखील लवकर पार पडल्या असल्याने मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून आधी निकाल ऑनलाईन जाहीर करून नंतर विद्यार्थ्यांना मार्क्सशीट (Marks Sheet) हातात दिली . त्यामुळे तुम्हांला प्रश्न पडला असेल की मार्क्सशीट कधी मिळणार तर जाणून घ्या आतापर्यंत बोर्डाने दिलेली माहिती काय आहे?

बारावीच्या निकालाची मार्क्सशीट कधी मिळणार?

बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केल्यानंतर शाळा/ कॉलेजमध्ये जाऊन मार्क्सशीट घेता येते. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरात मार्क्सशीट हातात दिली जाते. 12वीनंतर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ही मार्क्सशीट आवश्यक आहे. महाराष्ट्र बोर्डाने जुलै-ऑगस्ट 2025 च्या SSC, HSC परीक्षांसाठी खाजगी उमेदवारांसाठी नोंदणी केली सुरू .

ई मार्क्सशीट कशी काढाल?

12वीच्या विद्यार्थ्यांना हातात मार्क्सशीट मिळेपर्यंत ई मार्क्सशीट ऑनलाईन डाऊनलोड करण्याची आणि सादर करण्याची मुभा आहे. National e-Governance Division, Ministry of Electronics & Information Technology (MeitY) च्या सहकार्याने MSBSHE बोर्ड विद्यार्थ्यांना त्यांच्या DigiLocker खात्यात डिजिटल स्वरूपात बारावीच्या (इयत्ता १२वी) गुणपत्रिका आणि उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र देते. हे डिजिटल पद्धतीने कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी आणि पडताळणीसाठी एक व्यासपीठ आहे. ई-मार्कशीट पोर्टल DigiLocker सोबत एकत्रित केले आहे.

बारावीचा निकाल कुठे पाहता येतो?

बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर mahresult.nic.in, mahahsscboard.maharashtra.gov.in, examresults.net/maharashtra या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, आईचे नाव टाकावे लागणार आहे. तुम्ही उत्तीर्ण असाल तर विषयानुसार गुण आणि एकूण टक्केवारी ऑनलाईन पाहता येणार आहे.