देशभरामध्ये सध्या राज्य शिक्षण मंडळाचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही यंदा 12वी, 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाचे वेध लागले आहेत. दरम्यान महाराष्ट्र शिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वीच 15 जुलै पर्यंत एचएससी म्हणजेच 12वीचे निकाल आणि त्यापाठोपाठ जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत 10वीचे निकाल जाहीर करण्याचा मानस व्यक्त केला होता. आता जसा जुलै महिन्याचा मध्य जवळ येत आहे तशी 12वीच्याविद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता वाढत आहे. अद्याप बोर्डाकडून 12वी निकालाचीअधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरीही येत्या काही दिवसांत ती जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण बोर्ड निकालापूर्वी केवळ 1-2 दिवस आधीच तारीख जाहीर करते. त्यामुळे येत्या आठवड्याभरात कधीही तारीख जाहीर होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र राज्यात यंदा कोरोनाचं थैमान सुरू असल्याने 12 वीच्या परीक्षा वेळेत पार पडल्या असल्या तरीही पेपर तपासणी आणि निकाल लावण्याच्या प्रक्रियेमध्ये वेळ लागत आहे. मात्र कोरोना व्हायरस लॉकडाऊनमध्येही संबंधित शिक्षक, अधिकारी यांना विशेष सवलत देत निकाल लावण्याची प्रक्रिया वेगवाग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान मंडळाच्या 9 देखील विभागातून पेपर तपासणी आणि निकाल प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच ऑनलाईन माध्यामातून अंतिम निकाल जाहीर केला जातो.
विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण निकालाच्या दिवशी दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील. Maharashtra Board Exam Results 2020: 10वी 12वी च्या निकालामध्ये यंदा नव्या गुणदान पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी किमान किती टक्के गुण हवेत?
बोर्डाचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?
# अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
# या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
# त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
# तुमचा निकाल स्क्रिनवर झळकेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
दरम्यान विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही निकालाच्या दिवशी त्यांचे मार्क्स पाहता येतात. ऑनलाईन निकालानंतर काही दिवसात गुणपत्रिका विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमधून, शाळांमधून उपलब्ध करून दिली जाते.