Maharashtra Board Class 10th, 12th Results: महाराष्ट्रामध्ये बोर्डाची परीक्षा दिलेल्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या निकाल (HSC Results) होणार अशी चर्चा सोशल मीडियामध्ये रंगली होती. मात्र अद्याप शिक्षण बोर्डाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे महाराष्ट्र SSC, HSC 2020 बोर्ड परीक्षांचे निकाल लांबणीवर पडतील असे संकेत काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. त्यानुसार आता शिक्षण मंडळाकडून जाहीर होणार्या अधिकृत तारखेबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात उत्सुकता आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीचे पेपर नियोजित वेळापत्रकानुसार पार पडले परंतू 10 वीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर रद्द झाला आहे. त्यामुळे यंदाच्या निकालाबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता. सोबतच यंदा मूल्यांकन पद्धतीमध्येही बदल झाले असल्याने नेमकं यंदा 10वी, 12वीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती मार्कांची गरज आहे? हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. तर पहा यंदाची नवी गुणदानपद्धती कशी असेल? Maharashtra HSC Results 2020: 12वीचा निकाल आज नाही; mahresult.nic.in वर लवकरच अधिकृत तारीख जाहीर होणार.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तीर्ण होण्यासाठी किती मार्क्स हवेत?
शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून 12वी करिता अंतिम मूल्यांकन हे 650 ऐवजी 600 गुणांवर होणार आहे. पर्यावरण शास्त्र विषयाच्या 50 गुणांचे आता श्रेणींमध्ये रूपांतर करून निकाल लावला जाणार आहे. 12 वी मध्ये उत्तीर्ण होण्यास विद्यार्थ्याला प्रत्येक विषयामध्ये लेखी व अंतर्गत मूल्यमापन/ तोंडी/ प्रकल्प/ प्रात्याक्षिक/ चाचणी मिळून किमान 35% मार्क्स मिळवणं गरजेचे आहे. दरम्यान ग्रेस मार्क्स, क्रीडा क्षेत्रात प्राविण्य आणि स्काऊट, गाईडच्या विद्यार्थ्यांना अधिक सवलतीचे मार्क्स पूर्वीच्या नियमांप्रमाणेच दिले जाणार आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तीर्ण होण्यासाठी किती मार्क्स हवेत?
यंदा कोरोना व्हायरस संकट काळात महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर रद्द झाला आहे. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल खास ठरणार आहे. यंदा इतर विषयामध्ये मिळालेल्या मार्कांच्या सरासरीने भूगोल विषयाचे मार्क दिले जातील. त्यानुसार विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल लावला जाणार आहे. 12वी प्रमाणेच 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील प्रत्येक विषयामध्ये लेखी व अंतर्गत मूल्यमापन/ तोंडी/ प्रकल्प/ प्रात्याक्षिक/ चाचणी मिळून किमान 35% मार्क्स मिळवणं गरजेचे आहे. Maharashtra Board SSC Result 2020: 10 वीच्या रद्द झालेल्या भूगोल विषयाचे गुण सरासरी दिले जाणार; जून महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल लागण्याची शक्यता.
महाराष्ट्रामध्ये यंदा 15 लाख 5 हजार 27 जणांनी 12वीची तर 17 लाखाहून अधिक विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली आहे. दरम्यान या सार्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची तारीख मंडळाकडून लवकरच सांगितली जाणार आहे. तर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येणार आहे.