महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल 10 जून दिवशी लागतील अशी सोशल मीडियामध्ये चर्चा होती. मात्र यंदा Maharashtra HSC Result थोडा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कोरोना संकटामध्ये पेपर तपासणीचं आणि निकाल लावण्याचं मोठं आव्हान शिक्षण मंडळासमोर आहे. मात्र लॉकडाऊनमध्येही संचारबंदीचे नियम शिथिल करून मॉडरेटर्स आणि इतर कर्मचार्यांना कामावर येण्याची मुभा होती. मात्र अजूनही हे काम सुरू असल्याने लवकरच निकालाची तारीख विद्यार्थ्यांसमोर येईल. Maharashtra Board Exams 2020 Results: महाराष्ट्र राज्य 10वी, 12 वी बोर्डाचे निकाल तारखांबाबत शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण; विद्यार्थ्यांना दिला 'हा' सल्ला.
सर्वसामान्यपणे शिक्षण मंडळ किमान 1-2 दिवस आधी दहावी- बारावी बोर्डाच्या निकालाच्या तारखा जाहीर करतं. तसेच विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन माध्यमातून पाहता येतो. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदा शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरच बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 10 जून पर्यंत दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करा असे आदेश दिले होते. सुरूवातीला राज्य सरकारने त्याला सहमतीदेखील दर्शवली होती. मात्र राज्यातील कोरोना व्हायरासची गंभीर स्थिती पाहता आता हे निकाल लांबणीवर पडू शकतात असे संकेत काही दिवसांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते.
राज्यामध्ये 18 मे पासून पोस्टाच्या माध्यमातून उत्तरपत्रिका पाठवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. पेपर तपासून काही ठिकाणी स्कॅन कॉपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आता 10-12 ची निकाल लागण्यासाठी यंदा जुलै महिना उजाडण्याची शक्यता आहे. दरम्यान कोरोना संकटात यंदा 12 वीचे सारे पेपर सुरळीत पार पडले आहेत पण दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करावा लागला आहे. त्याचे गुण सरासरीने दिले जातील.
महाराष्ट्रात यंदा कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील रद्द झाल्या आहेत.