महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांचे निकाल लांबणीवर पडले आहेत. आत्तापर्यंत मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात 12वीचे निकाल जाहीर होत होते मात्र यंदा अजून तारीख जाहीर न झाल्याने सोशल मीडियामध्ये चर्चांना ऊत आला आहे. मात्र विद्यार्थ्यांमधील हा संभ्रम दूर करण्यासाठी शिक्षण विभागाकडून माहिती देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजून शिक्षण मंडळाकडून SSC म्हणजेच दहावी आणि HSC म्हणजे बारावीच्या उत्तर पत्रिकांचं आणि निकालांचं काम सुरु आहे. त्यामुळं येत्या काळात निकालांच्या तारखा या शिक्षण मंडळाकडूनच अधिकृतपणे जाहीर करण्यात येतील असं राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी स्पष्ट केलं आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसमोर आता आगामी शैक्षणिक वर्षाचं टेंशन आहे. मात्र राज्यातील सार्या 9 विभागाकडून उत्तर पत्रिका तपासण्याचं आणि निकाल लावण्याचं काम पूर्ण झाल्यानंतरच हा निकाल लागू शकतो. सध्या लॉकडाऊनमध्ये उत्तरपत्रिका तपासणार्या आणि मॉडरेटर्स सह इतर अत्यावश्यक कर्मचार्यांना सुरूवातीपासूनच मुभा देण्यात आली होती. CBSE Board Exam 2020 Results: सीबीएसई बोर्डाच्या 10वी, 12वी परीक्षांचा निकाल 15 ऑगस्ट पर्यंत लागण्याची शक्यता.
शिक्षण मंडळाकडून यंदा बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाच्या तारखेबाबत सोशल मीडियामध्ये फिरणार्या तारखांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान निकालाची तारीख जाहीर झाली की अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. दरम्यान यंदा कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे 10वीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. तर 12 वीचे सारे पेपर सुरळीत झाले आहेत. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्लॅनिंग करणार्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता आहे.