एका कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राचार्याने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kaij) तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय आरोपीला पाठीशी घातल्यामुळे पीडिताच्या आईसह भाऊ, चूलते, चुलतभाऊ यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जन्मदात्या पित्याचा अन्याय सहन न झाल्याने एका मुलीने तिच्या मैत्रीणीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर मैत्रिणीच्या मावशीमार्फत एका समाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसाशी संपर्क साधला. यानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल करून घेतली. या घटनेने आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.
नवनाथ काकड असे आरोपी पित्याचे नाव आहे. नवनाथला हा आपली पत्नी आणि 3 मुलींसह बीड येथे राहतो. नवनाथ याने पिता, पुत्रीच्या नात्याला काळीमा फासणार प्रकार केला असून त्याने 8 वर्षापूर्वी याच नराधमाने त्याच्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला होता. तसेच दुसऱ्या मुलीवरही लैंगित अत्याचार केला होता. त्यानंतर आपली पत्नी गावी गेल्यानंतर तिसऱ्या मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार थोरल्या मुलीने आपल्या आईला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, याची वाच्यता करू असे सांगत तिला काठीने बेदम मारहाण केली. तसेच दोरखंडाने तिचा गळा आवळून जीव मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, वडिलांकडून होणाऱ्या अन्याय सहन न झाल्याने तिने सर्व प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर मैत्रिणीच्या मावशीची मदत घेत केज पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी वेळ न घालवता आरोपी पित्याला अटक केली. हे देखील वाचा- मुंबई: नग्न फोटो दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 21 वर्षीय तरुणाला झाली 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा
महाराष्ट्रात महिलेवर होणाऱ्या अत्याचारांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच बीड येथील घटनेने सर्वांचे लक्ष केंद्रीत करून घेतले आहेत. आता मुली आपल्या घरातच सुरक्षित नसल्याचे या घटनेतून कळत आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचारला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात दिशा कायदा आणला जाणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती.