मुंबई: नग्न फोटो दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 21 वर्षीय तरुणाला झाली 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

14 वर्षीय मुलीला नग्न फोटो दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत (Mumbai) घडलीय. यात 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून पोस्को कोर्टाने त्याला 20 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सनी कांबळे असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपी सनी कांबळे (Sunny Kamble) याने 26 नोव्हेंबर 2017 रोजी मंदिरात गेलेल्या पीडित मुलीला जबरदस्तीने मंदिराजवळी खोलीत नेले. आणि तिथे तिला मोबाईलमध्ये नग्न फोटो दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने ते फोटो त्याच्या मित्राला दाखवले. याबाबत त्याला जाब विचारायला गेले असता सनीने तिच्याशीच वाद घातला. सनीच्या सर्व त्रासाला कंटाळून पीडित मुलीने त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.  हेही वाचा- धक्कादायक! दीड वर्षाच्या भाचीवर मामाने केला बलात्कार; चिमुरडीला झुडूपात फेकून देऊन झाला पसार

मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी सनी कांबळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पोस्को कोर्टाने आरोपीला २० वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. 2017 पीडित मुलीची सनी कांबळे सोबत भेट झाली होती. त्यानंतर तो तिला वारंवार भेटत असे. तसेच तिने त्याच्या प्रेमाची कबुलीही तिला दिली होती. मात्र मला तू आवडत नाहीस असे त्या पीडित मुलीने सनीला स्पष्ट सांगितले होते. मात्र जर तू मला भेटली नाहीस तर मी तुझ्या कुटूंबाला आणि तुला मारून टाकेन अशी धमकी द्यायला लागला, असे पीडित मुलीने कोर्टात सांगितले.