विधानसभा निवडणुकीसाठी AIMIM पक्षाकडून उमेदवरांची चौथी यादी जाहीर
Imtiyaz Jaleel | ((Photo Credits: Archived, Modified, Representative image)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी एमआयएमआयएम (AIMIM) पक्षाकडून उमेदवारांची चौथी यादी आज (बुधवार, 25 सप्टेंबर 2019) जाहीर करण्यात आली. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ खासदार आणि एमआयएम पक्षाचे नेत इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी ही यादी जाहीर केली. चौथ्या यादीत एकूण तीन उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे.

  • इक्बाल अहमद खान (पाशा) - (जालना)
  • विवेक देविदास ठाकरे - रावेर (जालना)
  • मोहम्मद युसुफ अब्दुल हमीद मुल्ला (धुळे)

दरम्यान, एमआयएम पक्षाने या आधी उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीपासून फारकत घेतल्यानंतर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय एमआयएम पक्षाने घेतला आहे.