महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: भाजप कडून शिर्डी मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीला हायकोर्टात आव्हान
राधाकृष्ण विखे-पाटील (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Assembly Elections) भाजप (BJP) कडून शिर्डी (Shirdi) मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु काँग्रेसने विखे पाटील यांच्या उमेदवारीवरुन आता प्रश्न उपस्थितीत करत प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत पोहचवले. मात्र विखे पाटील यांच्या उमेवारी अर्जावर काँग्रेसने घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला सोमवारी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले जाणार असल्याचे कॉंग्रेस उमेदवार सुरेश थोरात (Suresh Thorat) यांनी जाहीर केले आहे. विखे पाटलांनी जे शपथ दाखल केले आहे, ते नोटरी कायद्यानुसार नसून, साधे दस्त आहे. त्यामुळे विखे यांचा अर्ज अवैध ठरविणे कायद्याने बंधनकारक ठरते, असे थोरात यांचे म्हणणे आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपले नातेवाईक सुरेश थोरात यांना उमेदवारी दिली आहे. या दोघा प्रमुख उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. शनिवारी अर्जाची छाननी होती. यावेळी कॉंग्रेस उमेदवार यांनी सुरेश थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीला हरकत घेणारा अर्ज दाखल केला. विखे पाटलांनी नामनिर्देश अर्ज दाखल करतांना जे शपथ पत्र दाखल केले आहे ते कायदेशीर नाही. नोटरी कायद्यानुसार ते नसून एक साधे दस्त आहे. त्यात अनेक त्रुटी आहेत, अशी हरकत घेत विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेस उमेदवार सुरेश थोरात यांनी शिर्डीचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती.यावर दुपारी दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाले. मात्र, या हरकती फेटाळून राधाकृष्ण विखे पाटील यांचा अर्ज वैध ठरविला.(Maharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 'हे' असतील भाजपचे स्टार प्रचारक; पहा यादी)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने झेंडा रवला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.