Maharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 'हे' असतील भाजपचे स्टार प्रचारक; पहा यादी

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) भाजपने 22 स्टार प्रचारकांची (Star Campaigners) यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह, स्मृती इराणी या महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.

Maharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 'हे' असतील भाजपचे स्टार प्रचारक; पहा यादी
File Image | Amit Shah | PM Narendra Modi (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) भाजपने 22 स्टार प्रचारकांची (Star Campaigners) यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह, स्मृती इराणी या महत्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेमध्ये दणदणीत विजय मिळवलेल्या भाजपसाठी आता विधानसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षांनी कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे भाजपने त्यांच्या महत्वाच्या नेत्यांना प्रचारासाठी रिंगणात उतरण्याचे ठरवले आहे. भाजपने प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या महत्वाच्या मंत्र्यांचा समावेश आहे.

पहा भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी - 

स्टार प्रचारक यादी
भाजप स्टार प्रचारक

भाजपने तोडफोडीचे राजकारण करत लोकसभेप्रमाणही निवडणूकही मोठ्या उंचीवर नेवून ठेवली आहे. त्यामुळे महायुतीसोबतच  विरोधी पक्षानेत्यांसाठीही ही निवडणूक फार महत्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी थेट पीएम नरेंद्र मोदी  आणि अमित शाह  यांची मदत घ्यायची ठरवली आहे. यांच्यासह केंद्रातील जगत प्रकाश नद्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, पियुष गोयल, यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. मोदी-शहा यांच्या सभा काही महत्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघात होणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, गिरीश महाजन, उदयनराजे भोसले इ. यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2019: विधानसभा निवडणुकांनिमित्त महाराष्ट्रात नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या सभांचा धडाका; सीएम देवेंद्र फडणवीस घेणार तब्बल 65 सभा)

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या 10, अमित शाह यांच्या 20 तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बल 65 सभा राज्यात होणार आहेत. निवडणुकांच्या आधी भाजपने राज्यात महाजनादेश यात्रेचे आयोजन केले होते. त्यानंतर आता प्रचाराच्या सभांमध्ये थेट नरेंद्र मोदी आणि अमित शाह सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे अमित शाह पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2019 10:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).