
बीड मध्ये धनंजय मुंडे (Dhanajay Munde) विरूद्ध पंकजा मुंडे (Pankaja Mumde) ही विधानसभा निवडणूकीमधील (Maharashtra Assembly Elections) रणधुमाळी यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी स्टेजवर पंकजा मुंडेंना चक्कर आली. त्यावेळेस धनंजय मुंडेंकडून झालेल्या आरोपांमुळे व्यतित असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. या प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. यावेळेस 'बहिणाबाई' असा उल्लेख करण्यामध्ये चक्कर येण्यासारखं काय आहे? असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा, परळी: विधानसभेच्या प्रचारसभेत पंकजा मुंडे चक्कर येऊन कोसळल्या (Watch Video)
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वादानंतर अनेकांनी सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी धनंजय मुंडे यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामध्ये पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होता. हा आरोप फेटाळत लावत धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ क्लिप एडिट करून पसरवली जात असल्याचं म्हटलं आहे. परळी: वादग्रस्त क्लिप प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल.
पंकजा-धनंजय मुंडे यांच्या वादामध्ये राज्य महिला आयोगाननेदेखील दखल घेतली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरुद्धच्या तक्रारीची गंभीर दखल घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या तत्परतेबद्दलही शरद पवारांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.