विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी 66 लाख रुपयांची रोकड हस्तगत; मुंबई पोलिसांची कारवाई
Mumbai Police | (File Photo)

Maharashtra Assembly Elections 2019: निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि आदर्श आचारसंहितेची (Model Code of Conduct) घोषणा केल्यानंतर पहिल्याच दिवशी मुंबई पोलीसांनी मोठी कारवाई केली. मुंबई पोलिसांनी भुलेश्वर परिसरात ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल 66 लाख रुपयांची रोखड हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे. हस्तगत केलेली रक्कम प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्त केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्कम सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, मुंबई दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त निशित मिश्रा यांच्या विशेष पथकाने पोफळवाडी परिसरात छापा टाकला. या काराईत पोलीसांना तब्बल 66 लाख रुपयांची रक्कम सापडली. पोलिसांनी ही कारवाई शनिवारी सायंकाळी केली. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणाव रक्कम आलीच कशी, हे पैसे कोणाचे आहेत. कोणत्या कारणासाठी आणले होते, याबाबतचा तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकला नाही. ही रक्कम प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्त करुन पुढील तपास सुरु केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल, देवाणघेवाण अवैध मार्गाने केली जाते. मतदारांना आर्थिक प्रलोभनं दाखविण्यासाठीही पैशांचा वापर केला जात असल्याची अनेक उदारहणे पुढे येतात. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीसांची करडी नजर असते. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचे कायदा आणि सुव्यवस्था यांचा भंग होऊ नये. निवडणूका शांततामय आणि घटनेने ठरवून दिलेल्या मार्गाने पार पडाव्यात यासाठी पोलीस दक्ष असतात. अशा वेळी केलेल्या कारवाईत पोलीसांना मोठ्या प्रमाणावर रकमा सापडत असतात. (हेही वाचा, Maharashtra Assembly Elections 2019: सर्वच राजकीय पक्ष, उमेदवारांना विधानसभा निवडणूक सोपी नाही; निवडणूक आयोगाकडून अचारसंहिता नियमावली अधिक कडक)

निवडणूक प्रक्रिया

दरम्यान, महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार निवडणूक प्रक्रियेत मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिव असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडेल.