Maharashtra Assembly Elections 2019: सर्वच राजकीय पक्ष, उमेदवारांना विधानसभा निवडणूक सोपी नाही; निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता नियमावली अधिक कडक
MCC or Aachar Sanhita | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बिगूल अखेर वाजले. भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India) आयुक्त सुनील अरोडा (Sunil Arora) यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक जाहीर करत राज्यभारात आदर्श आचारसंहिता (Aachar Sanhita) लागू झाल्याची माहिती दिली. निवडणूक आयोगाने आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दरम्यान, निवडणूक आयोगाने निवडणूक काळात घालून दिलेल्या अचारसंहितेतील मुद्दे पाहता या वेळची निवडणूक राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यासाठी या वेळची सोपी असणार नाही हे स्पष्ट झाले आहे. जाणून घ्या निवडणूक आयोने उल्लेख केलेल्या अचारसंहितेतील महत्त्वाचे मुद्दे

निवडणूक आयोग आचारसंहिता

  • उमेदवारांना अर्ज दाखल करताना निवडणूक अर्जातील कोणताही रखाना रिकामा सोडता येणार नाही
  • निवडणूक अर्जातील रखाना रिकामा सोडल्यास उमेदवारी रद्द होणार
  • उमेदवारांना आपले गुन्हे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार
  • निवडणूक प्रचारात पर्यावरणपूर्क प्रचारसाहित्यालाच प्राधान्य द्यावे लागणार. प्लास्टिकचा वापर कटाक्षाणे टाळावा लागणार.
  • निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी निरिक्षकांची नियुक्ती केली जाणार
  • उमेदवारांना निवडणूक खर्चाचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला द्यावा लागणार
  • पाचही बुथवरील VVPAT मतमोजणी होणार
  • VVPAT बुथसाठी केल्या जाणाऱ्या बुथची निवड रँडमली केली जाणार.
  • पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी भरारी पथकं

(हेही वाचा, Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Dates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ‌तारखा जाहीर; 21 ऑक्टोबर ला एकाच टप्प्यात होणार मतदान; 24 ऑक्टोबरला मतमोजणी)

निवडणूक प्रक्रिया

दरम्यान, महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार निवडणूक प्रक्रियेत मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडेल.