महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Mahrashtra Assembly Elections 2019) साठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यासाठी अवघ्या आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना आज अखेरीस काँग्रेसच्या (Congress) प्रचारसभांचा श्रीगणेशा होणार आहे. माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या लातूर (Latur) सभेपासून या सभांची सुरुवात होणार असून आज (13 ऑक्टोबर) रोजी ते लातूर जिल्ह्यातील औसा (Ausa) व मुंबईतील चांदिवली (Chandivali) व धारावी (Dharavi) परिसरात सभा घेणार असल्याचे समजत आहे. यांनतर मंगळवारी म्हणजेच 15 ऑक्टोबरला सुद्धा त्यांच्या काही सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारी 2.15 वाजता लातूर मधील औसा येथून राहुल गांधी पहिली सभा घेतील, याठिकाणी काँग्रेसचे बसवराज माधवराव पाटील उमेदवार आहेत तर त्यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी सेक्रेटरी अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूरची सभा आटोपून राहुल गांधी थेट मुंबईत दाखल होणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता चांदिवली येथे नासिम खान आणि संध्याकाळी 6.30 वाजता धारावी येथून वर्ष गायकवाड यांच्यासाठी राहुल सभा घेणार आहेत.
काँग्रेसचे ट्विट
Shri @RahulGandhi will be in Maharashtra today to address three public rallies.
Stay tuned to our social media channels to watch him live.
YT: https://t.co/g2POk6TV2t pic.twitter.com/w48Pp6ydHx
— Congress (@INCIndia) October 13, 2019
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या बॅंकॉंक, कंबोडिया दौऱ्याच्या चर्चा ट्विटरवर रंगल्या होत्या. कॉंग्रेस पक्षाकडून अशा बातम्यांना दुजोरा दिला गेला नाही पण त्याचवेळी या बातम्या थेट फेटाळून सुद्धा लावण्यात आल्या नाही . काहींच्या मते राहुल गांधी बँकॉक मध्ये मजा कार्याला गेले असल्याचे म्हंटले जात होते तर काही माध्यमांतून राहुल हे कंबोडिया मध्ये विपश्यना करत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तूर्तास राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या आपल्या पहिल्याच सभेतून कोणाकोणाला टार्गेट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.