Maharashtra Assembly Elections 2019: MIM पक्षाकडून उमेदवारी यादी जाहीर, वंचित आघाडी बाबत प्रश्नचिन्हा कायम
Imtiaz Jaleel | File Photo | (Photo Credits: Twitter/imtiaz jaleel)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी (Assembly Elections)  तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता राजकीय पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. तर एमआयएम MIM) पक्षाने त्यांची विधानसभा निवडणूकीसाठी यादी जाहीर केली आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी (Vanchit Aaghadi) सोबतच्या हातमिळवणीबाबत अद्याप प्रश्नचिन्हा कायम असल्याचे दिसून येत आहे.

एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्या संमतीने उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. तर सोलापूर सांगोला मतदारसंघातून एमआयएमकडून अॅड शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्य मधून फारुक मकबूली शब्दी, सोलापूर दक्षिण येथून सुफिया तौफिया शेख आणि पुणे कंन्टोंमेट येथून हीना शफिक मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.(महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी AIMIM स्वबळावर लढणार; इम्तियाज जलिल यांच्याकडून मालेगाव, पुणे, नांदेड येथील उमेदवारी घोषित)

Tweet:

तर एमआयएमच्या उमेदवारी यादीखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वाक्षरी केली आहे. आतापर्यंत एमआयएमकडून सात उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली आहे.

काही दिवासांपूर्वी एमआयएमने वंचित बहुजन आघाडी सोबत युतीला ब्रेक देऊन आपल्या स्वबळावर महाराष्ट्रात 74 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम व वंचित बहुजन आघाडीने एकत्रित निवडणूक लढवली होती, यामध्ये इम्तियाज जलील निवडून आले होते, मात्र अंतर्गत वादामुळे आता हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.