महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: पालघर जिल्ह्यातील डहाणू ते वसई मतदार संघाचे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या
Palghar Constituency (Photo Credit: File Photo)

पालघर जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई अशी या मतदारसंघांची नावे आहेत. शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे फॅक्टरही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक विविध अंगाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत. त्यापैकी 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी तर 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत.

 

डहाणू मतदारसंघात क्रमांक- 128

डहाणू मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. डहाणू मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रस आणि कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व होते. परंतु, विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये आमदार पास्कल जान्या धनारे यांच्या रुपाने भारतीय जनता पक्षाचे पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार मांगात बारक्या हे धनारे यांच्या विरोधात उभे होते. विधानसभा निवडणूक 2014 साली धनारे यांना 44 हजार 849 मत मिळाली असून त्यांनी बारक्या यांचा 16 हजार 700 मतांनी पराभव केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये डहाणू मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- पास्कल धंदारे (भाजप), सुनिल ईभान (अपक्ष)

विक्रमगड मतदारसंघ क्रमांक- 129

विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर विक्रमगड मतदासंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आला आहे. विधानसभा निवडणूक 2014 साली भारतीय जनता पार्टीचे आमदार विष्णु रामा सवरा यांनी विक्रमगड मतदारसंघावर विजय मिळवला होता. यावेळी सवर यांच्या विरोधात शिवसेना पक्षाचे प्रकाश निकम उभे होते. या निवडणुकीत सवरा यांना 40 हजार 201 मत पडली होती तर, निकम यांना 36 हजार 356 मत मिळाली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये विक्रमगड मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- हेमंत सावरा (भाजप), सुनील भुसारा (राष्ट्रवादी), वैशाली सतीश जाधव (मनसे)

पालघर मतदारसंघ क्रमांक- 130

पालघर जिल्ह्यातील हा महत्वाचा मतदारसंघ आहे. अमित कृष्णा घोडा हे शिवसेना पक्षाचे आमदार असून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र गावित यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत अमित धोडा यांना 67 हजार 129 मत मिळाली असून त्यांनी गावित यांचा 18 हजार 948 मतांनी पराभव केला होता. महाराष्ट्राल विधानसभा निवडणूकीत..... यांना वसई मतदारसंघातून उमेदावारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पालघर मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- श्रीनिवास वनगा (शिवसेना), योगेश शंकर नाम (काँग्रेस), उमेश गोवारी (मनसे)

बोईसर मतदारसंघ क्रमांक 131

बोईसर मतदासंघ बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 साली बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास सुकूर तरे यांनी शिवसेना पक्षाचे उमेदवार कमलाकर दळवी यांचा 12 हजार 873 मतांनी पराभव केला होता. विलास तरे यांना 64 हजार 550 मत पडली होती तर, दळवी यांना 51 हजार 677 मत मिळाली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये बोईसर मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- विलास तरे (शिवसेना), दिनकर वाढान (मनसे)

नालासोपारा मतदारसंघ- 132

नालासोपारा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. ठाकूर यांनी गेल्या 3 विधानसभा निवडणुकीपासून नालासोपारा मतदारसंघात विजयी झेंडा हाती घेतला आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत ठाकूर यांनी भाजपचे शिरीष नाईक यांचा पराभव केला होता. ठाकूर यांना 1 लाख 13 हजार 566 मत पडली होती तर, नाईक यांना 59 हजार 067 मत मिळाली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये नालासोपारा मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- प्रदीप शर्मा (शिवसेना)

वसई मतदारमतदारसंघ क्रमांक- 133

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 साली बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र विष्णू ठाकूर यांचा 97 हजार 291 मतांनी विजय झाला होता. यावेळी अपक्ष पक्षाचे नेते विवेक पंडित यांचा 31 हजार 896 मतांनी पराभाव केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये वसई मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे- विजय पाटील (शिवसेना) यांच्याविरोधात प्रफुल्ल ठाकूर यांना उमेदवारी मिळाली

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.