महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल: एकमेव आमदार प्रमोद पाटील निवडून आल्यानंतर मनसेचे पहिले ट्विट, पाहा काय म्हणाले?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागले असून सर्वत्र विजयी उमेदवारचे संबधित पक्षाकडून अभिनंदन केले जात आहे. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अतिशय महत्वाची ठरणार होती. प्रचार दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीत विरोधीपक्षाची मागणी केली होती. तसेच आपल्या आक्रमक भाषणातून महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती लोकांसमोर मांडली होती. राज ठाकरे यांनी भाजप विरुद्ध मांडलेली ही भुमिका यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा मनसे समर्थकांकडून केली जात होती. मात्र, या निवडणुकीचा निकाल लागला असून मनसेचे एकमेव आमदार प्रमोद पाटील यांचा कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजय झाला आहे. यामुळे मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. यामुळे मनसे समर्थकांमध्ये निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे प्रमोद पाटील विजय झाले आहेत. प्रमोद पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे हे उभे होते. प्रत्येक फेरीमध्ये प्रमोद पाटील आणि रमेश म्हात्रे यांच्यात चढ उतार सुरुच होता. अखेर प्रमोद पाटील यांनी 5000 मतांच्या फरकाने रमेश म्हात्रे यांचा पराभव केला. यानंतर मनसेकडून प्रमोद पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. प्रमोद उर्फ राजू पाटील विजयी झाल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन,”. असे ट्विटमध्ये म्हटले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल: मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे यांचा पराभव

मनसे ट्वीट-

मतमोजणीच्या सुरुवातीला मनसे उमेदवार मंदार हळबे यांनी आघाडी घेतली होती. मात्र, अखेरच्या फेरीत भाजपचे आमदार रविंद्र विजय चव्हान विजयी झाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी जुन्नर मतदारसंघातून विजय मिळवला होता. परंतु शदर सोनावणे यांनी मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.