Rohini Khadse (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2019) मुक्ताईनगर मतदारसंघातून (Muktainagar vidhan sabha 2019) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचा पराभव झाला आहे. भाजपकडून एकनाथ खडसे यांचे टिकीट नाकारल्यानंतर रोहिणी यांना  (BJP) उमेदवारी देण्यात आली होती. मुक्ताई मतदारसंघातून रोहिणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी (National Congress Party) पुरस्कृत बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उभे होते. शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली. त्यानंतर मुक्ताईनगरात राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह समर्थकांनी एकच जल्लोष सुरु केला आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांना धक्के दिले आहेत. यातच मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेला पराभूत करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निकाल दरम्यान रोहिणी खडसे या 500-1000 मतांच्या फरकाने मागे पुढे जात होत्या. मात्र, निकालाच्या अखेर चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडेस यांच्यापेक्षा 1987 मत अधिक मिळवून मुक्ताईनगर मतदारसंघात मोठा विजय मिळवला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे देखील वाचा-महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 Live Updates: महायुतीला स्पष्ट जनादेश दिल्याने मतदारांचे आभार - देवेंद्र फडणवीस

यावर एकनाथ खडसें यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाले की "मुक्ताईनगर हा मतदार संघ भाजप ला मानणारा कमी आणि नाथा भाऊला अधिक मानणारा आहे. त्यामुळे या संदर्भात विचार करून तिकीट द्यायला हवे, परंतु तरीही पक्षाने रोहिणी खडसे यांना तिकीट दिले त्यानंतर कार्यकर्त्यांनी देखील पर्यत्न केले परंतु थोड्या मतांनी रोहिणी यानाचा पराभव झाला आहे".