Congress Candidates Final List: विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections 2019) आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने, कॉंग्रेसने उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. या यादीनुसार काँग्रेसकडून राघोबा कुडाळकर यांच्या जागी चेतन मोंडकर यांना संधी देण्यात आली आहे. तर चौथ्या यादीमध्ये कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कॉंग्रेसने नागपूर दक्षिण मधून आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. अशा प्रकारे एकूण पाच याद्या प्रसिद्ध करत कॉंग्रेसने आपल्या 147 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
कॉंग्रेस उमेदवारांची यादी -
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 147 जागांवर लढणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 124 जागा देण्यात आल्या आहेत. काँग्रेसने समाजवादी पक्षाला भिवंडी पूर्व, औरंगाबाद पूर्व आणि मानखुर्द हे तीन मतदारसंघ देण्याचे मान्य केल्यामुळे अबू आझमी आघाडीत सहभागी झाले. (हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2019: विधानसभा निवडणुकीसाठी BJP चे 164 उमेदवार रिंगणात; पहा संपूर्ण यादी
असा असेल निवडणूक कार्यक्रम -
27 सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना
4 ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत
5 ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी
7 ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत
21 ऑक्टोबर : मतदान प्रक्रिया
21 ऑक्टोबर : मतमोजणी
कॉंग्रेसने घटस्थापनेच्या मुहूर्तावर 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये 52 उमेदवारांची नावे होती. त्यानंतर 20, 19 उमेदवार कॉंग्रेसने जाहीर केले आहेत. आज कॉंग्रेसने 5 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. अशाप्रकारे कॉंग्रेसने आतापर्यंत 147 उमेदवार जाहीर केले आहेत. मुख्यमंत्र्यांविरुद्ध लढणारे आशिष देशमुखे हे भाजप मधून कॉंग्रेसमध्ये गेले आहे. देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे चिरंजीव आहेत.