Maharashtra Assembly Election 2019: विधानसभा निवडणुकीसाठी BJP चे 164 उमेदवार रिंगणात; पहा संपूर्ण यादी
भाजप (Photo Credit : File Image)

BJP Candidates Final List: आज विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर संध्याकाळी भाजप-शिवसनेने (BJP-Shivsena) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन औपचारिकरित्या महायुतीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या सर्व याद्या जाहीर केल्या आहेत. एकूण चार टप्प्यांमध्ये हे उमेदवार घोषित करण्यात आले होते. भाजपच्या या यादीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आले असून, काही दिग्गजांना डावलले असल्याचे दिसून येत आहे. यामधील सर्वात महत्वाची नावे म्हणजे राज पुरोहित, माजी मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ खडसे.

भाजप उमेदवारांची यादी -

यामधील दिलासादायक गोष्ट म्हणजे एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यासाठी भाजप, शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम, रासप आणि रयतक्रांती अशा पक्षांमध्ये महायुती झालेली आहे. यामध्ये भाजप 150 जागा लढवणार आहे, शिवसेना 124 जागा लढवणार आहे. मित्रपक्षांना 14 जागा देण्यात आल्या आहेत. समसमान (144-144) जागावापटपाचा आग्रह धरलेल्या शिवसेनेला अखेर 124 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम -

27 सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना

4 ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत

5 ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी

7 ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत

21 ऑक्टोबर : मतदान प्रक्रिया

21 ऑक्टोबर : मतमोजणी

दरम्यान, भाजपने प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी थेट पीएम नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांची मदत घ्यायची ठरवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या 10, अमित शाह यांच्या 20 तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बल 65 सभा राज्यात होणार आहेत. निवडणुकांच्या आधी भाजपने राज्यात महाजनादेश यात्रेचे आयोजन केले होते. त्यानंतर आता प्रचाराच्या सभांमध्ये थेट नरेंद्र मोदी आणि अमित शाह सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे अमित शाह पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.