महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 27 फेब्रुवारी ते 25 मार्च हे अधिवेशन चालणार आहे. तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) 9 मार्च दिवशी मांडला जाणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्याकडून नेमकं राज्यातील जनतेला काय मिळणार याकडे सार्यांचे ल्क्ष लागले आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पापूर्वी 8 मार्चला आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला जाणार आहे. त्यानंतर 9 मार्चला अर्थसंकल्प दुपारी 2 वाजता विधिमंडळामध्ये मांडला जाणार आहे. अद्याप राज्य मंत्रिमंडळाच्या रचनेत राज्यमंत्री नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळं अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होऊन वित्त खात्यासाठी राज्यमंत्री नेमण्यात आला नाही तर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर कोण सादर करणार हा प्रश्न कायम आहे.
पहा ट्वीट
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 27 फेब्रुवारीपासून मुंबई येथे प्रारंभ होणार असून त्याचे कामकाज आज निश्चित करण्यात आले. विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज सकाळी मुंबई येथे झाली. @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/60Yx4OT7Kr
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) February 8, 2023
महाराष्ट्रामध्ये आगामी काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणूका पाहता आता राज्यसरकारच्या अर्थसंकल्पामध्ये काही मोठ्या घोषणा होणार का? याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.