जगभरातील स्थानिक लोक त्यांच्या राज्यभाषेतच बोलतात, मग महाराष्ट्रातच का परप्रातीयांचा मुजोरपणा सहन करायचा? मराठीत न बोलणाऱ्या एअरटेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसेचा दणका

महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी भाषेचा वापर करण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) नेहमी अग्रेसर भुमिका मांडत आली आहे. एवढेच नव्हेतर, या मुद्द्यावरून मनसे अनेक आंदोलनेदेखील केली आहेत. यातच आपल्याला मराठी येत नसून हिंदीत बोलण्यात सांगणाऱ्या एअरटेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसे दणका दिला आहे. हा संपूर्ण प्रकार मुंबईतील कांदिवली परिसरातील चारकोपमध्ये असलेल्या एअरटेलच्या गॅलरीमध्ये घडला आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातील स्थानिक हे तिथल्या राज्यभाषेतच बोलताना आढळतील. मग महाराष्ट्रातच का हा परप्रांतीयांचा मुजोरपणा सहन करायचा? असा प्रश्न मनसे सरचिटणीस नयन कदम (Nayan Kadam) यांनी फेसबूकच्या माध्यामातून विचारला आहे. तसेच यासोबत त्यांनी एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. हे देखील वाचा- UGC Final Year Examination: विद्यापीठांच्या पदवी परीक्षा 2020 घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर महाराष्ट्र कॉंग्रेसची पहिली प्रतिक्रिया; पहा काय म्हणाले युवा अध्यक्ष सत्यजित तांबे

कालचीच घटना, एअरटेल कंपनीच्या गॅलरीमध्ये एक मराठी युवक आपल्या मोबाइलचे रिचार्ज करण्यासाठी गेला. त्याला रु. 249/- चा रिचार्ज करायचा होता त्यासाठी त्याने रु. 500/- एअरटेल कर्मचाऱ्याला देऊ केले आणि परतीचे रु. 251/- अपेक्षित होते. परंतु एअरटेल कर्मचाऱ्याने 1 रुपया कमी देऊन फक्त रु. 250/- दिले. सदर युवकाने अयोग्य रक्कम परत मिळाल्याने विचारणा केल्यावर एयरटेल कर्मचाऱ्याने अगदी तुसड्या भावाने त्याचे परतीचे पैसे देणे नाकारले आणि वरून "मला मराठी येत नाही तू हिंदीत बोल" अशी मागणी केली व त्याने आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत त्या युवकासोबत वाद घातला. त्या एयरटेल गॅलरीमध्ये 5-6 कर्मचारी असूनसुद्धा त्यातून एकालाही मराठी येत नसेल तर ती चिंतेची बाब आहे. एअरटेल ही कंपनी सर्व देशभर आपला कारभार चालवते आहे. प्रत्येक राज्यात 80% रोजगार हे तिथल्या स्थानिक जनतेलाच मिळाले पाहिजे असा नियम असताना या गॅलरी मध्ये एकाही कर्मचाऱ्याला मराठी बोलता येत नाही ही फारच चुकीची गोष्ट आहे. त्यात जर 1 रु ही कंपनी प्रत्येकाकडून अधिक घेत असेल तर ही संपूर्ण भारतात त्यांच्या ग्राहकांकडून करण्यात आलेली किती मोठी आर्थिक लूट झाली ! सदर युवकाने ही तक्रार मला फोन करून सांगितली. सरकारच्या GR नुसार तुम्ही कोणालाही राज्यात राज्यभाषेचा वापर न करता असं हिंदीत बोलायला लावणे चुकीचे आहे. मी आमच्या बोरिवली विधानसभेतील महाराष्ट्र सैनिकांना तातडीने चारकोप येथील एयरटेल गॅलरीमध्ये त्या युवकासोबत पाठवले. तिथल्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला असे काहीही न घडल्याचे सांगितले व महाराष्ट्र सैनिकांशी सुरुवातीला उद्धटपणे वर्तन केले. शेवटी मनसे काय हे कळल्यावर मात्र सर्व गोष्टी कबूल केल्या व माफी मागितली. तिथल्या कर्मचाऱ्याने सरते शेवटी सर्व कर्मचारी मराठीत बोलतील व त्यांना मराठी भाषा शिकवण्यात येईल ह्याचे आश्वासन दिले, अशा आशयाची पोस्ट नयन कदम यांनी केली आहे.

नयन कदम यांची फेसबूक पोस्ट-

तसेच, महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान होत असेल तर ही बाब फारच निंदनीय आहे, असे बोलत नयन कदम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांना टॅग केले आहे. मराठी भाषेचा मान जपण्यासाठी पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारदाराला जर तुम्ही दाबत असाल व उलटे फटकारणार असाल तर पोलिसांकडे येणारच कोण? पोलिसांनीं एयरटेलच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली पाहिजे होती. असे न करता पोलिसांनी विषय दाबण्याचा प्रयत्न केला आहे, असेही नयद कदम म्हणाले आहेत.