Food Grains Representative Photo (Photo Credits-Facebook)

सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या महाभयाण विषाणूशी लढा देत आहे. या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन ठेवण्यात आले आहेय अशा स्थितीत देशाचे आर्थिक नुकसान होऊ नये तसेच नागारिकांचेही हाल होऊ नये म्हणून अनलॉक 1(Unlock 1) सुरु करण्यात आले असून काही नियम शिथील करण्यात आले आहेत. तर महाराष्ट्रात (Maharashtra) हे अनलॉक 3 टप्प्यात विभागण्यात आले आहे. या स्थितीत राज्यातील नागरिकांना अन्नाचा पुरवठा सुरळीत झाला पाहिजे यासाठी राज्य सरकारने सर्वोतोपरी काळजी घेतली आहे. यामुळेच की काय भारतातील मोठ्या राज्यांमध्ये अन्न सुरक्षेच्या क्रमवारीत राज्याचा तिसरा क्रमांक लागला आहे. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं (FSSAI) ही आकडेवारी जाहीर केली आहे.

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं जाहीर केलेल्या यादीमध्ये मोठ्या राज्यांच्या यादीत पहिला क्रमांक गुजरात आणि दुसरा क्रमांक तामिळनाडूनं लावला आहे. तर तिस-या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. ही नक्कीच महाराष्ट्र वासियांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

हेदेखील वाचा- Maharashtra Unlock 1 Phase 3: महाराष्ट्र अनलॉक 1 च्या तिस-या टप्प्याला आजपासून सुरुवात, पाहा राज्यात काय सुरु काय बंद

खाद्य चाचणी सुविधा, नियमांचं पालन, ग्राहक जागरुकता, मनुष्यबळ आणि प्रशिक्षण यासारख्या 5 निकषांवर वर्षभर केलेल्या पाहणीतून हे क्रमांक काढण्यात आले आहेत. छोट्या राज्यांमध्ये पहिले ३ क्रमांक गोवा, मणिपूर आणि मेघालयाने पटकावले. केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड, दिल्ली आणि अंदमान पहिल्या तीन क्रमांकावर आहे.

आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची नवी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 85,975 वर पोहचला असून एकूण 3060 जणांचा बळी गेला आहे. तसेच कोविड19 चे राज्यात 43591 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे.