महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात कलम 188 अंतर्गत 1,22,772 गुन्हे दाखल तर 6 कोटीहून अधिक दंड वसूली- अनिल देशमुख
Home Minister Anil Deshmukh | Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही काही नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करण्यात आल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन ते आतापर्यंत कमल 188 अंतर्गत 1,22,772 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 6 कोटीहून अधिक दंड वसूली करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.(Coronavirus: मुंबईत होणाऱ्या कोरोना व्हायरस चाचण्यांची संख्या देशात सर्वाधिक- मुंबई महापालिका)

कोरोनाच्या काळात पोलीस हेल्पलाईन क्रमांक 100 वर लोकांकडून आतापर्यंत 1,00,203 कॉल आले आहेत. त्याचसोबत पोलिसांवर हल्ले केल्याची 258 प्रकरणे समोर आली असून 838 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. राज्यात कोरोना व्हारसमुळे 5,60,3030 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र 718 जणांनी या नियमाचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे.(महाराष्ट्र: लॉकडाऊनच्या काळात पाळीव प्राण्यांना आता घराबाहेर चालण्यासाठी घेऊन जाण्यास मालकांना परवानगी)

राज्यात अनधिकृतपणे वाहतूक केल्याने 1330 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पोलीस दलातील एकूण 2903 जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून 1373 जणांची प्रकृती सुधारली आहे. तसेच 31 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात आज कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण 2436 आढळून आले असून 139 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 80229 वर पोहचला आहे. त्यापैकी 2849 जणांचा कोविड19 मुळे बळी गेला असून अद्याप 35156 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.