Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. नागरिकांनी कोरोनाच्या विरोधात लढायचे असल्यास. त्यांनी घरातच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून रात्रदिवस उपचार केले जात आहेत. तसेच राज्य सरकारकडून सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाचा वेग संथ करण्यास सरकारला यश आले आहे. परंतु कोरोनाची साखळी अद्याप तुटली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. तर आता महाराष्ट्रात आज नवे 1230 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आकडा 23,401 वर पोहचला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 23 हजारांच्या पार गेला आहे. तर बळींचा आकडा 868 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. राज्याची रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोननुसार विभागणी करण्यात आली आहे. परंतु विविध ठिकाणची कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउनचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत.(मुंबईत आज नवे 791 कोरोनाबाधित रुग्ण तर धारावीत 57 जणांना COVID19 चे संक्रमण, शहरातील आकडा 14355 वर पोहचला)

तर कंन्टेंटमेंट झोन मध्ये नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीत. तसेच मुंबईतील घरे दाटीवाटीने असून तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे कठीण आहे. तरीही या ठिकाणी कोरोना संबंधित संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे. 10 ते 17 मे पर्यंत लॉकडाउनच्या नियम अधिक कठोर होणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.