प्रतिकात्मक फोटो (File Photo)

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत (Maharashtra State Power Generation Co. Ltd.) इंजिनिअर्स आणि इतर काही पदांसाठी भरती प्रक्रीया सुरु झाली आहे. 38 पदांसाठी ही भरती असून 15 ऑक्टोबर 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यात इंजिनिअर्स (Engineer) पदासाठी 11 तर केमिस्ट (Chemist) पदासाठी 27 जागा आहेत. जाणून घेऊया या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत, निवड प्रक्रीया, वेतन इत्यादींविषयी... (Lok Sabha Recruitment 2021: लोकसभा सचिवालयात विविध पदांची भरती, जाणून घ्या कसा करता येईल अर्ज?)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

इंजिनिअर्स (Engineer) पदासाठी अर्ज करताना इंजिनिअरिंगची डिग्री किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. थर्मल पॉवर प्लांटमध्ये कमीतकमी 5 वर्षाचा अनुभव आवश्यक. कोळसा युनिटमध्ये अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

केमिस्ट (Chemist) पदासाठी अर्ज करताना B.Sc (Chemistry) / M.Sc (Chemistry)/ B.Tech (Chemistry) पदवी असणं आवश्यक. थर्मल पॉवर प्लांटमध्ये कमीतकमी 5 वर्षाचा अनुभव आवश्यक. येथे पहा अधिकृत नोटीफिकेशन.

पात्रता:

उमेदवारांना मराठी भाषेचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक. त्याचबरोबर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा मंडळ किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

निवड प्रक्रीया:

ऑक्टोबर/ नोव्हेंबर 2021 महिन्यात निवड प्रक्रिया पार पडेल.

वैयक्तिक मुलाखतीद्वारे निवड करण्यात येईल.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता:

इच्छुक उमेदवार 'सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती सहकारी. लि., एस्ट्रेला बैटरी विस्तार कंपाऊंड, कामगार शिबिर, धारावी रोड, माटुंगा, मुंबई – 400019' या पत्त्यावर अर्ज पाठवू शकतात. तसंच या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी https://www.mahagenco.in/ वर क्लिक करा. 15 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून दोन्ही पदांसाठी भरती शुल्क 800 रुपये आहे.

वेतन:

इंजिनिअर्स (Engineer) - Rs.40,000/- रुपये प्रतिमहिना

केमिस्ट (Chemist) - Rs.40,000/- रुपये प्रतिमहिना

दरम्यान, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर आणि इंजिनियर्ससाठी ही मोठी संधी आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा पुरेपर लाभ घ्यावा.