उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (Archived, edited images)

Lok Sabha Election Results 2019: शिवसेना भाजप युती केवळ लोकसभा निवडणूकच नव्हे तर विधानसभा निवडणुकीतही कायम राहील. आता ही वेळ कोणाच्या पराभवाबद्दल बोलण्याची नाही. जल्लोषाची आहे. असे सांगतानाच 'लावा रे ते फटाके' असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत खोचक टोला लागावला.

लोकसभा निवडणूक निकालाचे महाराष्ट्र आणि देशभरातील चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदे उद्धव ठाकरे बोलत होते. मराठी मते फोडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्याबाबत काय सांगाल असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता,  अशा गोष्टींवर मी फारसे बोलत नाही. मी फक्त इतकेच म्हणेन की 'लावा रे तो व्हिडिओ'. (हेही वाचा, LIVE महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live News Updates: 'लाव रे ते फटाके' म्हणत उद्धव ठाकरे यांची विजयावर प्रतिक्रीया)

दरम्यान, या वेळी बोलताना मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे मोठे बंधू आहेत. आणि मी उद्धव ठाकरे यांचा छोटा भाऊ आहे. उद्धव ठाकरे हेही नरेंद्र मोदी यांचे छोटे बंधू आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.