Lok Sabha Elections 2019: आचार संहिता भंग केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने दाखल केली तक्रार
Maharashtra Congress Chief Milind Deora (Photo Credits: Twitter|@milinddeora)

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील (South Mumbai  Lok Sabha Constituency) उमेदवार मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्याविरोधात निवडणूक आचार संहिता भंग (Model Code of Conduct) केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी 'जैन धर्मा'बदल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मिलिंद देवरा यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची महाराष्ट्र राज्य निवडणूक (Maharashtra Election Commission) आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आज ( 19 एप्रिल ) दिवशी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात ही तक्रार नोंदवल्याची माहिती देण्यात आली आहे. WATCH VIDEO:पर्युषण पर्व काळात जैंन मंदिराबाहेर मांस शिजवणारी शिवसेना अल्पसंख्याक समूह विरोधी; : मिलिंद देवरा

ANI Tweet

4 एप्रिल दिवशी झवेरी बाजार येथील प्रचार सभेत बोलताना मिलिंद देवरा यांनी शिवसेनेने जैन धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मतदान न करून धडा शिकवा असे जाहीर आवाहन केले होते. शिवसेना पक्ष हा अल्पसंख्यांच्या विरोधात आहे. काही वर्षांपूर्वी शिवसेनेने पर्युषण काळात जैन मंदिरांबाहेर मांसाहार शिजवून त्यांचा अपमान केला होता. आता यावरून त्यांना मतांमधून धडा शिकवण्याची वेळ आली आहे. यानंतर एका शिवसैनिकाने निवडणूक आयोगाकडे तक्रार करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्ना बद्दल आणि चुकीच्या आरोपांबद्दल तक्रार केली.

निवडणूक आयोगाने तक्रारीची गंभीर दखल घेत आता मुंबई पोलिसांना याप्रकरणी एफआरआय दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पर्युषण हा जैन धर्मियांचा पवित्र काळ असतो. या दिवसांमध्ये आठ दिवस उपवास केले जातात. Lok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)

मिलिंद देवरा यांच्या विरोधात शिवसेनेचे अरविंद सावंत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 29 एप्रिल दिवशी मुंबईमध्ये मतदान होणार आहे तर 23 मे दिवशी मतमोजणी होणार आहे.