Lok Sabha Elections 2019: मिलिंद देवरा यांच्या प्रचार व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी यांचा समावेश (Watch Video)
Mukesh Ambani (Photo Credit: File Photo)

मुंबईसह देशामध्ये सध्या लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Election) चे वारे वाहत आहेत. यामध्ये मुंबईतील उच्चभ्रू समजला जाणारा दक्षिण मुंबईचा मतदारसंघात (South Mumbai  Lok Sabha Constituency) यंदा मिलिंद देवरा (Milind Deora) यांच्या पाठीशी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पासून अगदी सामान्य उद्योजक उभा असल्याचं चित्र आहे. नुकताच एका व्हिडिओच्या माध्यमातून रिलायंसचे 'मुकेश अंबानी', 'कोटक' समुहाचे उदय कोटक (Uday Kotak) यांनी मिलिंद देवरांना शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची नियुक्ती; संजय निरुपम यांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून उमेदवारी

मिलिंद देवरा यांचं ट्विट 

मुंबईमध्ये उद्योग परत आणून तरूणांना रोजगार मिळवून देणं हेच माझं उद्दिष्ट असेल असे मिलिंद देवरांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहलं आहे. मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना साऊथ मुंबईची पुरी जाण आहे असे व्हिडिओत म्हणाले आहे. अनेक सामान्य उद्योजकांनी मिलिंद देवरा मदतीसाठी तत्पर असतात अशा आशयाच्या भावना व्यक्त करत 'मिलिंद देवरा मुंबई का कनेक्शन' असल्याचं सांगितलं आहे.  Lok Sabha Elections 2019: ऑनलाईन आणि SMS च्या माध्यमातून तुमचं मतदान केंद्र कसं पहाल?

मुंबईमध्ये 29 एप्रिल दिवशी मतदान आहे. तर 23 मे दिवशी मतमोजणी होणार आहे.