WATCH VIDEO:पर्युषण पर्व काळात जैंन मंदिराबाहेर मांस शिजवणारी शिवसेना अल्पसंख्याक समूह विरोधी; : मिलिंद देवरा

ज्यांनी भगवान महाविरांचा अपमान केला अशा लोकांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. या लोकांना आपल्या मतदानाच्या माध्यमातूनच धडा शिकवायला हवा, असेही देवरा यांनी या वेळी म्हटले.

WATCH VIDEO:पर्युषण पर्व काळात जैंन मंदिराबाहेर मांस शिजवणारी शिवसेना अल्पसंख्याक समूह विरोधी; : मिलिंद देवरा
Mumbai Congress President Milind Deora | (Photo Credits: Facebook)

Lok Sabha Elections 2019:  शिवसेना (Shiv Sena) ही अल्पसंख्याक समूह विरोधी आहे. पर्युषण पर्व (Paryushana Festival) काळात शिवसेनेने जैन मंदिराबाहेर मांस शिजवले होते, अशी टीका करत काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष (Mumbai Congress President) आणि दक्षिण मुंबई मतदारसंघ (Mumbai South Lok Sabha constituency) उमेदवार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी शिवसेनेनेने महाविरांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. ते निवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते. मिलिंद देवरा यांचा थेट सामना शिवसेना विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) याच्याविरुद्ध होत आहे. या मतदारसंघात गुजराथी आणि जैन मतदारांचा समावेश आहे.

या वेळी बोलताना देवरा यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, भगवा महाविरांनी जगाला अहिंसेचा संदेश दिला. आजही त्यांचे अनुयायी अहिंसेचा पुरस्कार करतात. जगभरात त्यांच्या शिकवणीला मानले जाते. असे असतानाही काही वर्षांपूर्वी पर्युषण पर्व काळात शिवसेनेने जैन मंदिराबाहेर जाऊन मांस शिजवले. ज्यांनी भगवान महाविरांचा अपमान केला अशा लोकांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. या लोकांना आपल्या मतदानाच्या माध्यमातूनच धडा शिकवायला हवा, असेही देवरा यांनी या वेळी म्हटले. (हेही वाचा, शिवसेनेमुळे मुंबईमधून मराठी माणूस कमी झाला, 28 कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरे भागीदार; नारायण राणे यांची टीका)

एएनआय ट्विट

दरम्यान, काही व्यापारी बांधव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून शिवसेनेला मतदान करण्याचा विचार करतील. पण, जेव्हा महाविरांचा अपमान झाला तेंव्हा आपण आला होतात का, असाही विचार करा. अशा लोकांना मतदानाच्या माध्यमातूनच धडा शिकवा असेही देवरा यांनी या वेळी म्हटले.

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2019 10:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).