Lok Sabha Election 2024: देशाची 18 वी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) मतमोजणी अगदी धुमधडाक्यात पार पडत आहेत. मात्र, राज्यात भाजपसाठी वाईट बातमी आहे. महाराष्ट्रातले 3 केंद्रीय मंत्री पिछाडीवर आहेत. नारायण राणे (Narayan Rane), भारती पवार (Bharti Pawar)आणि कपिल पाटील (Kapil Patil) पिछाडीवर आहेत. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय ताकदीवर शंका उपस्थित होत आहे. उमेदवारांच्या मतदार संघात नेत्याविषयी असलेली नाराजी मतमोजणीतून दिसत आहे. (हेही वाचा:Lok Sabha Election 2024 : ठाण्यातून नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर; ठाकरे गटाला मोठा धक्का )
नारायण राणे-
रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपाचे नारायण राणे आणि ठाकरे शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यात कांटे की टक्कर दिसत आहे. मतमोजणीच्या दोन फेऱ्यांचे निकाल हाती आले आहेत. यानुसार नारायण राणे 2305 मतांनी आघाडीवर होते. विनायक राऊत पहिल्या फेरीत 400 मतांनी आघाडीवर होते. नारायण राणेंना सिंधुदुर्गातून मतांची आघाडी मिळत असून शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात विनायक राऊतांना आघाडी मिळत आहे. सध्या तिसऱ्या फेरीअखेर राऊत यांनी 30 मतांची लीड घेतली आहे.
पहा पोस्ट -
Lok Sabha Result 2024 Live : महाराष्ट्रातले 3 केंद्रीय मंत्री पिछाडीवर; नारायण राणे, भारती पवार आणि कपिल पाटील पिछाडीवर https://t.co/FzUOpuLHGs#माझाखासदार #ResultsOnABP #ResultsOnABPMajha #loksabhaelecetion2024 #ElectionsResults pic.twitter.com/RJK0JB1tHl
— ABP माझा (@abpmajhatv) June 4, 2024
भारती पवार-
दिंडोरी लोकसभेची पहिल्या फेरीची मतमोजणी अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी 1 हजार मतांनी आघाडी घेतली होते. दिंडोरीत पहिल्या फेरीचे एकूण मतदान 53807 मतांपैकी डॉ. भारती पवार यांना 22 हजार 183 तर भास्कर भगरे यांना 23 हजार 443 इतकी मते मिळाली आहेत. तर नोटाला 398 मतदान झाले आहे. तर दुसऱ्या फेरीत भगरे 6 हजार मतांनी आघाडीवर आहेत.