Lockdown: लॉकडाउनच्या काळात रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक; वाहनचालकाला अटक
फोटो सौजन्य - फाइल फोटो

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे राज्यातील दारूच्या दुकानांनाही टाळे लागले आहे. मात्र, काही ठिकाणी अवैधरित्या दारुची विक्री होत असल्याचे समजत आहे. मात्र, आता दारुची वाहतूक करण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केला जात असल्याचे पाहून पालघर जिल्ह्यातील नागरिक चक्रावून गेले आहेत. नालासोपारा (Nalasopara) येथे रुग्णवाहिकेच्या नावाखाली दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला तुळींज पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी मारूती व्हॅनमधे असलेली 3 लाखांहून अधिक किमतीची दारू जप्त केली आहे.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पोलीस कर्मचारी आपला जीवाची पर्वी न करता उत्तम कामिगिरी बजावत आहेत. मात्र, काही ठिकाणी राज्य सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्या जात असल्याचे अनेक बातमी आपल्या कानावर पडत आहेत. यातच नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या नावाखाली मारूती व्हॅनमधून दारूची वाहतूक होत असल्याचे लोकांच्या समोर आणले आहे. ही व्हॅन मुंबईच्या दिशेने जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. तसेच यात 3 लाख 26 हजार रुपयांची असलेली दारू जप्त करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात राज्य सरकारने दारु विक्रीला परवानगी दिली होती. मात्र, दारुच्या दुकांनासमोर तळीरामांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची अधिक शक्यता होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा दारूच्या दुकानांना टाळे लावण्यात आले होते. हे देखील वाचा- केईएम मधील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या नवऱ्याला, 10 वर्षीय मुलीला सुद्धा COVID19 चे संक्रमण

Nitin Gadkari: मॉल्स, सलोन्स, ब्युटी पार्लर सुरु होण्याबाबत गडकरींनी दिली महत्वाची माहिती - Watch Video

याआधी वसई परिसरातील पंचवटी भागात अवैध दारुची वाहतूक केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी एका वाहनचालकावर गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी स्थानिक पोलिसांनी 4 लाख 31 हजरांची दारु जप्त करण्यात आली होती.