राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना पुन्हा एकदा पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून शरद पवार यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आणि लॉकडाऊन (Lockdown) यांमुळे महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांसमोर निर्मण झालेल्या अडचणी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणल्या आहेत. महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्र (Real Estate Sector) आणि बांधकाम व्यावसायिक सध्या अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी भरीव मदत करण्यात यावी अशी मागणी पवार यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे. पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे पत्र पोस्ट केले आहे.
शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना व्हायरस संकटाचा आणि त्याच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गेली तीन महिने झाले हे क्षेत्र पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठी पडझड झाल्याचे पाहायाल मिळते. देशाच्या एकूण उत्पन्नात म्हणजेच जीडीपीमध्ये हे क्षेत्र मोलाची भर घालत असते. त्यातच मजूरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे या क्षेत्रातील कामं मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. अशा स्थितीत विक्रीही मंदावली आहे. त्यामुळे या क्षेत्राताल सावरण्यासाठी केंद्र सरकारने हात देणं महत्त्वाचे आहे, असे शरद पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.
शरद पवार यांनी पंतप्रधानांना या आधीही पत्र लिहिले होते. त्या पत्रात पवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. कोरोना संकटाचा देशातील कृषी क्षेत्रावर अधिक मोठा परिणाम झाला आहे. कृषी क्षेत्राचा देशातील अन्नधान्य उत्पन्न आणि महागायी यांवर थेट परिणाम होते, त्यामुळे या क्षेत्राला मोठी मदत करण्याची मागणी या पत्रात पवार यांनी केली होती. तर आता नव्याने पाठवलेल्या पत्रात पवार यांनी रिअल इस्टेट क्षेत्राला मदत करण्याची मागणी पवार यांनी केली आहे. (हेही वाचा, शेतकऱ्यांना वाचवा; राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र)
शरद पवार फेसबुक पोस्ट
दरम्यान, शरद पवार यांच्याप्रमाणेच कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) या संस्थेने देखील एक पत्र लिहिले असून, रिअल इस्टेट क्षेत्राकडे सरकारने अधिक गांभीर्याने पाहण्याची आणि हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.