शरद पवार (Photo credit : Youtube)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींचे पॅकेजवर शरद पवार यांनी नाराजी दर्शवली आहे. केद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर समाधानी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजममध्ये शेतकऱ्यांसाठी पाहिजे अश्या किंवा आवश्यक त्या ठोस तरतुदी नाहीत, असे पवार यांनी पत्रात लिहले आहे. तसेच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा करताना शेतकरी जगला पाहिजे, शेतकऱ्याला वाचवा, असेही पवार यांनी पत्राद्वारे म्हणले आहेत.

कोरोना विषाणूमुळे प्रत्येकजण संकटात सापडले आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाउन कायम ठेवण्यात आले आहे. देशात लॉकडाउन घोषीत करुन आता 55 दिवस उलटले आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्याचे लॉकडाऊन आणि कोरोनाने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे मोदींनी शेतकऱ्यांसाठी आवश्यक पावले उचलावीत, असे शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे. हे देखील वाचा- औरंगाबाद येथे कोरोनाचे नवे 59 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1 हजाराच्या पार

शरद पवार यांचे ट्वीट-

सध्या आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था ही करोना संकटामुळे आणि लॉकडाउनमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळा तोंडावर असताना शेतकरी मानसिकदृष्ट्या खचला आहे. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी ठोस उपाय योजना कराव्यात अशी विनंती मी आपल्याला पत्राद्वारे करतो आहे असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.