देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश येत्या 31 मे पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने रविवारी जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली आहे. तर आता औरंगाबाद येथे सुद्धा कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून तेथे नवे 59 रुग्ण आढळून आल्याने आकडा 1021 वर पोहचला आहे. राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून कोरोनाबाधित रुग्णांवर अहोरात्र उपचार केले जात आहेत.
राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता त्याच्या रुग्णांसाठी क्वारंटाइन आणि आयसोलेशन सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. तसेच कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसून वैज्ञानिकांकडून त्यावर अधिक संशोधन करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात पोलिसांकडून बहुमोलाचे कार्य केले जात आहेत. पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा अहोरात्र रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. तर रेड झोन मध्ये लॉकडाउनचे नियम अधिक कठोर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. मात्र ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये लॉकडाउनचे नियम शिथील जरी केले असल्यास नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Coronavirus: महाराष्ट्र पोलीस दलातील 1273 कर्मचारी कोरोना व्हायरस संक्रमित; 11 जणांचा मृत्यू)
#औरंगाबाद जिल्ह्यात नवे ५९ कोरोना बाधित रुग्ण तर जिल्ह्यात एकूण 1021 कोरोनाबाधित.#CoronaInMaharashtra
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) May 18, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णांचा आकडा 33053 वर पोहचला असून 1198 जणांचा बळी गेला आहे. तर मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार गेल्याने आता सरकारकडून या ठिकाणी ठोस पावले उचलली जाणार आहेत. नागरिकांना कोरोनाच्या काळात घरात थांबून त्याच्या विरोधात लढा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर राज्यात कोरोनाचा वेग संथ करण्यास आपल्याला यश आले असून त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.