Rajesh Tope (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाउनची (Lockdown) घोषणा केली होती. देशात लॉकडाउन असतानाही कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रासह अनेक राज्यात 31 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. मात्र, यापुढेही नागरिकांनी सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास 30 एप्रिलनंतरही महाराष्ट्रात लॉकडाउन वाढण्यात येणार आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोरोना सदृष्य आणि कोरोना विषाणूचे लक्षणे नसलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी रुग्णालयांची विभागणी करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.

कोरोना विषाणू हे जगावर आलेले मोठे संकट आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूशी लढण्यासाठी 170 हून अधिक देश याचा सामना करत असल्याचे समजत आहे. सध्या भारतातही कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर महाराष्ट्रात 14 एप्रिल नव्हेतर 31 एप्रिलपर्यंत लॉकडाउन पुढे ढकलण्यात आले आहेत, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली नुकतीच केली आहे. परंतु, लॉकडाउनचा कालावधीत आणखी भर पडण्याची शक्यता राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या प्रमाणानुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार केले जाणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्राचे दिशानिर्देश उद्यापर्यंत येतील त्यानंतर हे झोन तयार केले जातील, असेही आरोग्यमत्र्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी किमान या शब्दावर जोर दिला आहे. त्यामुळे लोकांनी यापुढेही नियम आणि शिस्त पाळली नाही तर 30 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवावे लागणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. हे देखील वाचा- Coronavirus: पुण्यात आज 7 नवे कोरोना बाधित रुग्ण: शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 213 वर पोहोचली; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 16 लाख 91 हजार 719 वर पोहचली आहे. यांपैकी 1 लाख 2 हजार 525 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 68 हजार 669 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 7 हजार 447 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 239 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 643 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1666 वर पोहचली आहे. यात 110 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 117 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.