Migrant Workers Come Out on Road in Bandra (Photo Credits: Twitter/@WarisPathan)

मुंबई (Mumbai) शहरातील वांद्रे रेल्वे स्टेशन (Bandra Railway Station) येथे लॉकडाऊन काळात मोठ्या संख्येने गर्दी (Bandra Incident) होण्यास कारण ठरल्याचा ठपका ठेवत एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर (Mumbai Lockdown) आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन (Lockdown) आहे. असे असतानाही मुंबई येथील वांद्रे स्टेशनवर परप्रांतीय कामगारांनी काल (मंगळवार, 14 एप्रिल 2020) मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. अचानकपणे ही गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणावर जमलीच कशी? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकाही केली. तसेच, राजकारणही तापले होते.

कोरना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. जेणेकरुन नागरिकांची गर्दी टळेल आणि कोरोना संसर्गापासून बचाव होईल. त्यासाठी मुंबई शहरात संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही बांद्रे परिसरात अत्यंत मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी जमली. त्यातून कोरोना व्हायरस संसर्ग होण्याचा मोठाच धोका निर्माण झाला. परिणामी नागरिकांच्या आरोग्याच्या समस्येसह राज्य सरकार आणि मुंबई पोलीस टीकेचे धनी झाले.

पीटीआय ट्विट

दरम्यान, वरील सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल सरकारने घेतली. त्यानुसार इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जमण्यास आणि चुकीचे वृत्त देऊन दिशाभूल केल्या प्रकरणी एका वृत्तवाहिनीच्या एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, Bandra Incident: मुंबईच्या बांद्रा येथे कामगारांना भडकावून एकत्र घेऊन येणाऱ्या 'विनय दुबे'ला अटक; सोशल मिडीयावर लिहिली होती चिथावणीखोर पोस्ट)

रेल्वे मंत्रालय ट्विट

दरम्यान, देशात लॉकडाऊन असताना रेल्वे, बस आणि विमान वाहतूक बंद असताना एका विशिष्ट तारखेस विशेष रेल्वे वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. तसेच, या विशेष रेल्वे गाडीने राज्यातील विविध शहरात असलेले कामगार आपल्या गावी जाऊ शकतील अशा आशयाचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले होते. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. परिणामी इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली, अशी चर्चा आहे.