Representational Image | Driving (Photo Credits: Unsplash)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने यापूर्वीच अनेक सोयी-सुविधा बंद केल्या आहेत. आता कोरोना विषाणू रुग्णांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने, प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (RTO) संगणकीकृत लर्निंग लायसन्स चाचण्या (Learning Licence Tests) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही कालावधीसाठी या चाचण्या घेणे टाळण्यात येणार आहे. मंगळवारी जारी केलेल्या परिपत्रकात, राज्य परिवहन आयुक्तांनी आरटीओला तालुका पातळीवरील शिबिरांना काही कालावधीकरिता स्थगिती देण्यास सांगितले. अशा ठिकाणी वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन फिटनेस चाचण्यांसाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही गोष्ट पाळण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात आजमितीस 50 आरटीओ व उप आरटीओ कार्यालये आहेत. आयुक्तांनी सर्व आरटीओला, महिन्याच्या अखेरपर्यंत लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या करून, ती नेहमीपेक्षा 10 टक्के करावी असे निर्देश दिले आहेत. या परिपत्रकात आरटीओला संगणकीकृत चाचण्या घेण्याऐवजी, अर्जदारांना स्वतंत्रपणे कॉल करून तोंडी चाचण्या घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरटीटीओने फक्त अशाच वाहनचालकांसाठी परवान्यांची चाचणी घ्यावी, ज्यांचा परवाना या महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येणार आहे आणि इतर सर्व भेटी पुढे ढकलाव्यात असेही सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: Coronavirus च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालयाच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या परीक्षा रद्द)

कार्यालयांमध्ये कमीतकमी गर्दी व्हावी यासाठी आरटीओला सूचना देताना, परिपत्रकात जुन्या वाहनांची पुन्हा नोंदणी करण्याबरोबरच नवीन वाहनांच्या नोंदणीची कामेही नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यास सांगितले आहे. ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, वाहनाची पुन्हःनोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण, परवान्याशी संबंधित कामे 31 मार्चपर्यंत करण्यात यावीत. तर वाहन हस्तांतरण आणि हायपोथिकेशन अशी कामे पुढे ढकलण्यात यावीत, असे नमूद केले आहे.

सोबत सुरक्षेचा उपाय म्हणून, आरटीओ निरीक्षकांना वाहन तंदुरुस्ती चाचणी घेताना मास्क आणि ग्लोव्हज सारख्या गोष्टींचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र एका आरटीओ कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार. रोज कार्यालयात 350 लोक येत असतात, पुढील तीन महिन्याच्या भेटी या आधीच निश्चित करण्यात आल्या आहेत, त्यामुळे गर्दीचे नियोजन करणे अवघड ठरणार आहे.